राहुरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
राहुरी महसूल प्रशासनाला व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.
राहुरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
राहुरी महसूल प्रशासनाला व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.
राहुरी (व्हिजन 24 न्यूज) – मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेले आहे. आज आठवा दिवस आहे त्यांची तब्बेत खालावत चालली आहे. तरीही सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. सरकारने सांगितले होते विशेष अधिवेशन घेऊन ओबीसी मधून मराठा समाजाला कुणबी आरक्षण दिले जाईल परंतु तसे न करता सरकार ने मराठा समाजाची दिशाभूल केली आहे वेळ काढून पणा करत आहे म्हणून राहुरी तालुका सकल मराठा समाज व मराठा एक ग्राम समितीच्या वतीने राहुरी महसूल प्रशासनाला व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील मराठा आंदोलका वरील गुन्हे मागे त्वरित घेण्यात यावे व मराठा समाजाला संगेसोयरे यांना ही ओबीसी मधून लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजात संतप्त भावना उमटत आहेत.
तरी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात यावेळी कैलास तनपुरे, संदीप आढाव, मधुकर घाडगे, विनायक बाठे, राजेंद्र खोजे, अविनाश शिरसागर, संदीप गाडे, बंटी जरे, बलराज पाटील, राजेंद्र लबडे, रवींद्र भुजाडी, रवींद्र तनपुरे, ज्ञानेश्वर गडाख, प्रताप जाधव, अक्षय आरोटे, सुभाष तारडे, पंकज बोरुडे, अनिल पेरणे, सुनील तनपुरे, अमोल पवार, गणेश पवार, राहुल तमनर, तुषार पवार, दीपक चव्हाण, गणेश पवार, प्रज्वल झावरे, सचिन साबळे, शरद डुकरे, जालू कानडे आदी मराठा बांधव उपस्थित होते.