क्राईम

अल्पवयीन मुलीस पळून नेण्यास मदत करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक

अल्पवयीन मुलीस पळून नेण्यास मदत करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक

राहुरी (व्हिजन २४ न्यूज)  – अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार करून विवाह करण्याच्या उद्देशाने पळून नेण्यास मदत करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. राहुरी पोलीस ठाणे गु. र. न. 39/24 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी विश्वास संतोष मकासरे वय 20 वर्ष रा. संक्रापूर याने पळवून नेलेले असून त्यास त्याची आई नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष रा. संक्रापूर हिने सदर आरोपीस तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 366 अ वाढवण्यात आले असून पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुलाची आई-नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष हीस दि. 05/02/2024 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपास कामी तथा लैंगिक अत्याचारासाठी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे कामी अटक करून चार दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली होती.

तपासा दरम्यान सदर पीडित मुलीस पळवून नेण्यासाठी होमगार्ड रमेश भास्कर मकासरे, वय 26 वर्ष, रा चिंचोली फाटा, ता. राहुरी याने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास आज रोजी अटक करण्यात आलेली असून त्याने पीडित मुलीस व आरोपीस धुळे जिल्ह्यात पाठवले असल्याचे समजल्याने पोलीस हवालदार शेळके व नदीम शेख व तपास पथक पुढील तपास कामी धुळे जिल्ह्यात पाठवण्यात आलेले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस हवालदार शेळके, नदीम शेख, ढाकणे, यादव, गायकवाड, एएसआय ज्ञानदेव गरजे, पोलीस हवालदार वैराळ, पोलीस शिपाई बडे यांच्या पथकाने केलेली आहे.

सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी /लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास आरोपीचे नातेवाईक मित्र सहकार्य करत असल्यास त्यांनाही दाखल गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास करण्यात येणार आहे.

तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आव्हान करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×