सामाजिक

व्यापारी असोसिएशन राहुरी यांना एक कॅमेरा पोलिसांसाठीचे आव्हान 

राहुरी शहरातील स्वच्छता दूत यांचा सन्मान

व्यापारी असोसिएशन राहुरी यांना एक कॅमेरा पोलिसांसाठीचे आव्हान 

राहुरी शहरातील स्वच्छता दूत यांचा सन्मान 

(व्हिजन २४ न्यूज) राहुरी पोलीस स्टेशन येथे दि. 7/2/2024 रोजी सायंकाळी राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशन यांची पोलीस ठाणे राहुरी येथे मीटिंग घेण्यात आली. यावेळी विविध व्यापारी यांच्या समस्या / अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांच्याकडे असणारे उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरे रोडच्या अँगल मध्ये लावण्याबाबत सूचना केल्या व लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना केले आहेत. सदर कॅमेरे हे पोलीस विभागाच्या निर्देशाप्रमाणे लावण्यात येत असल्याने कुणीही व्यापाऱ्यांना परस्पर मागणार नाही याबाबत लेखी पत्र देण्यात आलेले आहे.

तसेच राहुरी शहरातील पार्किंगची समस्या दूर करण्याकरिता राहुरी नगर परिषदेमार्फत पार्किंग रेषा आखून कारवाई करणे बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच वाहतुकीस अडथळा करणारे अतिक्रमण नगरपरिषदेमार्फत तात्काळ काढून घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमादरम्यान राहुरी नगर परिषदेकडील स्वच्छता दूत यांचा त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता करण्याकरिता केलेल्या सहकार्याकरिता तसेच राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये करत असलेल्या स्वच्छतेच्या कार्याकरिता सन्मान करण्यात आला. ज्यांनी पोलीस स्टेशन व परिसराची साफसफाई कामासाठी मदत केली असे श्री पवार साहेब सेंनीटर इन्स्पेक्टर राहुरी नगरपरिषद, क्रेन उपलब्ध करून देणारे यमनाजी आघाव, वकील दांपत्य दुहेरी हत्याकांडाचा तपास ज्याच्या सतर्कतेमुळे तत्काळ होवू शकला असे पो कॉ नदीम शेख, पो कॉ ढाकणे यांचा ही सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रम श्री. नामदेव पाटील तहसीलदार राहुरी, यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमाकरिता श्री. अरुणजी तनपुरे, सभापती मार्केट कमिटी राहुरी, श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे मुख्याधिकारी नगरपरिषद राहुरी, बापूसाहेब शिंदे कृषी अधिकारी राहुरी, प्रकाशशेठ पारख अध्यक्ष राहुरी व्यापारी असोशियन, सूर्यकांत भुजाडी केमिस्ट् असोशियन, देवेंद्र लांबे ऑटोमोबाईल असोशियन, विशाल तारडे हार्डवेअर असोशियन, कांताशेठ तनपुरे बिल्डिंग मटेरियल असोसिएशन, वैभव धुमाळ फोटोग्राफर असोसिएशन, प्रवीण दरक कापड व्यापारी असोसिएशन, रवींद्र उदावंत ज्वेलर्स असोसिएशन, आत्तार कादरी मोबाईल दुकान असोसिएशन, प्रसाद कोरडे सलोन असोसिएशन, एकनाथ खेडेकर हॉटेल असोसिएशन, नंदू शेठ भट्टड पेंट असोसिएशन, मोहन जोरी फिटर असोसिएशन, सचिन वने फर्टीलायझर असोशियन, सलीम भाई शेख हॉकर्स असोसिएशन, अनिल कासार भांडी असोसिएशन, प्रवीण ठोकळे शूज मार्ट असोशियन, दीपक मुक्ता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक असोसिएशन व राहुरी नगर परिषदेकडील स्वच्छता दूत असे हजर होते.

सर्व नागरिकांना / व्यापारी हातगाडी दुकानदार ठेलेवाले पथारी वाले यांना आव्हान करण्यात येते की, रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने आपली दुकाने लावू नयेत, मोटरसायकल वाहने पार्किंग करू नये, कोणतीही रस्त्यावर अतिक्रमण करू नये, अन्यथा अतिक्रमणाबाबत नगरपरिषदेमार्फत व वाहतुकीस अडथळा केल्यास पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

संजय ठेंगे
पोलीस निरीक्षक
राहुरी पोलीस स्टेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×