पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी
जिल्हा प्रतिनिधी / मधुकर केदार
पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी
व्हिजन २४ न्यूज
शेवगाव तालुका येथे जनजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याबाबत वरील विषयावर अनुसरून तक्रार करण्यात येते की आमच्या थाटे गावांमध्ये जनजीवन मिशन योजने अंतर्गत पाण्याच्या टाकीची काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असुन सदर काम हे आज रोजी अर्धवट अवस्थेत बंद आहे. सदर टाकी कामामध्ये मीसर वाळू वापरली असुन या कामाला पाणी खुप कमी मारले आहे, तसेच सिमेंट व लोखंड देखील कमी प्रमाणात वापरले आहे.
त्यामुळे कधी पण टाकी जमीन दोस्त होऊ शकते, या बाबतीत संबंधीत ठेकेदार कंपनीत विचारले असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ज्या जागेमध्ये टाकीचे काम चालू आहेत त्या जागेचा ग्रामपंचायतकडे बक्षीस पत्र देखील केलेले नाही. तरी देखील टाकीचे काम सुरू केले कसे त्यामुळे सदर टाकीचे काम हे थांबविण्यात यावे नवीन जागा उपलब्ध करून कायदेशीर बाबींची सर्व पूर्तता करून नवीन टाकीचे काम सुरू करावे. तसेच या पूर्वी झालेल्या टाकीचे कामाची उच्चस्तरीय चौकशी संबंधीत ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी.