शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या पाथर्डी तालुका युवक अध्यक्ष पदी नारायण भागवत कराड यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी / मधुकर केदार
शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या पाथर्डी तालुका युवक अध्यक्ष पदी नारायण भागवत कराड यांची निवड
व्हिजन २४ न्यूज
पाथर्डी : शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंचच्या माध्यमातून खेडोपाडी तरुणांना नवी दिशा देण्यासाठी तरुणांची मोट बांधून महापुरुषांची विचार धारा व संविधनाचा आदर व संविधानाचा जागर ह्या कार्यक्रमा अंतर्गत संविधानाची मुलभूत अधिकाराची माहिती सर्व सामान्यात रुजू करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंच कार्य करत आहे. ह्या सामाजिक अनुषंगाने श्री भगवान बाबा गडाच्या पायथ्याशी कार्यरत असणारे तरुण तडफदार नवं उद्योजक नारायण भागवत कराड यांची पाथर्डी तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली . ह्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे व संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे सर यांनी आपली विचारधारा व तरुणांना मार्गदर्शन केले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ह्या छोट्या खाणी कार्यक्रमास गणेश एकनाथ सानप यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व मंचांचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप भाऊ ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष यांना फोनद्वारे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमास संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष लिलाधर पवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मानव हित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पवळे, पंचायत कर्मचारी कृष्णा सोमनाथ बटुळे, मन्सुर तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवळे, ग्रामपंचायत सदस्य बाळू एकनाथ बटुळे, अरुण पवळे, ग्रामपंचायत सदस्य सुशांत उनवते, सुदाम सोनवणे, लक्ष्मण पवळे, भगवान गड परिसरातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य तरुण उपस्थित होते.