मराठा सर्वेक्षणाचे काम ६५% विहीत वेळेत होणार पुर्ण !
मराठा सर्वेक्षणासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते !
मराठा सर्वेक्षणाचे काम ६५% विहीत वेळेत होणार पुर्ण !
व्हिजन 24 न्यूज
अहमदनगर (प्रशांत बाफना) / मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने गोखले इन्स्टिट्यूटमार्फत सुरू केलेल्या मराठा आणि इतर समाजाचे सर्वेक्षण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असला तरी जवळपास ६५% काम झाले असुन विहीत मुदतीत हे काम पूर्ण होणार असल्याचे महसुल विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात २११ प्रगणक १७ पर्यवेक्षक सर्वेक्षणाचे काम करत असुन एकुण २८६३७ कुटूंबाचे हे सर्वेक्षण केले जाणार आहे पैकी आजपर्यंत २०४९० कुटूंबाचे सर्वेक्षणाचे काम झाले असुन विहीत वेळेत तहसिलदार डॉ. बिपीन पाटील व ना. त. शिवनाथ खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली हे काम पुर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली, संकलीत करावी लागत असलेली माहितीची जवळपास १८४ प्रश्नाची प्रश्नावली व त्याची पुर्ण माहिती घेतली जात आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.
शाळेचे शिक्षक सर्वेक्षणात गुंतल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही बोलले जाते तरी ही दुसरीकडे आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रगणक घरोघरी जात आहेत पण ॲपमध्ये माहीती साठवली जात नाही. एका कुटूंबासाठी किमान एक तास वेळ लागत असल्याचे सांगितले जाते, रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेऊन ते पुर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. प्रश्नांची उत्तरे संकलित करताना दमछाक होत आहे. जटील आणि किचकट प्रश्न आणि काही माहितीला ॲपमध्ये पर्यायच उपलब्ध नाहीत. एखादी व्यक्ती निरक्षर आहे. तर त्याला पर्याय नाही. प्रगणकाला ३१ जानेवारी या तारखेची वेळमर्यादा दिलेली असल्याने हे काम करताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागतेय. मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन आदी अमागास जात संवर्गाचे सर्वेक्षण यात होत आहे.
आम्ही सर्वेक्षण रात्री साडेआठ पर्यंत गावात सर्वे करत आहोत सुरूवातीस अडचणी आल्या, दिवसभरात एका घराचा डाटा अपलोड होत होता. शिक्षण विचारले तर निरक्षर व्यक्तीसाठी रकाना नाही. जास्त प्रश्न असल्याने वेळ लागत आहे. तांत्रिक अडचणी दूर करून सर्वेक्षण वेळेत पूर्ण करू असे विठ्ठल जाधव प्रगणक यांनी सांगितले .