पालकमंत्र्यांच्या भेटीमुळे जायकवाडी जलाशयातून ताजनापुर लिफ्ट योजनेमधील शिल्लक पाणी शेवगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना मिळण्याच्या आशा पल्लवित -जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे
अहमदनगर प्रतिनिधी / प्रशांत बाफना
पालकमंत्र्यांच्या भेटीमुळे जायकवाडी जलाशयातून ताजनापुर लिफ्ट योजनेमधील शिल्लक पाणी शेवगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना मिळण्याच्या आशा पल्लवित- जि. प. सदस्या सौ. हर्षदा काकडे
व्हिजन 24 न्यूज
शेवगाव तालुक्यातील वरूर-आखेगावसह इतर गावांमधील पाझर तलाव, बंधारे भरून देण्याची योजना आखून तिला मंजुरी द्यावी या मागणीसाठी कृती समितीचे सदस्य अॅड. शिवाजीराव काकडे व जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरूर-आखेगावसह ९ गावांतील शेकडो ग्रामस्थांनी पहाटे ०६.०० वा. ‘मोटार सायकल पाणी यात्रा’ काढून ‘पाणी द्या, मते घ्या’ या आगळ्या वेगळ्या मागणीचा सौदा घेऊन कृती समिती सदस्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर येथे भेटून या मागणीचे निवेदन दिले. यावेळी माणिक म्हस्के, गोरक्ष वावरे, नामदेव विघ्ने, महादेव जवरे, लक्ष्मण गवळी, लहू जायभाये, आदिनाथ लांडे, भानुदास कुसारे, मधुकर वावरे, बाबासाहेब ढाकणे, सतीश म्हस्के, नामदेव ढाकणे, नामदेव सुपेकर, अशोक गोर्डे, दादा सातपुते, काशिनाथ रुईकर, बबन लबडे, विठ्ठल झिरपे, जनार्धन ढाकणे, देविदास वावरे, देविदास ढाकणे, रमेश जवरे, भगवान गोर्डे, म्हातारदेव केदार, सकाहारी भापकर, भास्कर देशमुख, समशेर पठाण, आदिनाथ धावणे, नंदू कर्डिले, रमेश ढाकणे, वामन जवरे, सतिश काटे, कृष्णा जायभाये, ज्ञानदेव वीर, राजेंद्र लोणकर, सखाराम घावटे, गणेश मोरे, रंगनाथ ढाकणे, सौ.शितल केदार, सौ.सुशीला धावणे, सौ. इंदूबाई ढाकणे, सौ.सुनीता धावणे आदि शेतकरी यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
पुढे बोलतांना सौ. काकडे म्हणाल्या की, गेल्या ४ वर्षापासून तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीसह शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत. अहमदनगर येथे ९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘क्रांती दिनी’ जलसंपदा विभाग अहमदनगर येथे मुक्काम ठोको आंदोलन केल्यामुळेच या योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता मिळून सर्वेक्षण पूर्ण झाले. आता या सर्वेक्षणाला मान्यता देऊन तालुक्यातील दुष्काळी गावांतील पाझर तलाव, बंधारे भरून मिळावेत असेही त्या बोलतांना म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची कृती समितीसोबत बैठक लावतो असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कृती समिती सदस्यांसह प्रत्येक गावातून शेकडो पती-पत्नी शेतकरी जोडीने या मोटारसायकल पाणी यात्रेमध्ये सहभागी झाले होते.