दिल्ली येथे शेतकरी संघटनांची तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद – मा. रघुनाथदादा पाटील
भारतीय किसान सांघ परीसंघ (सिफा) व देशातील इतर राज्या राज्यातील शेतकरी संघटनांची राष्ट्रीय परिषद दिल्ली येथील आंध्र प्रदेश भवन या ठिकाणी दि. ५, ६, ७ फेब्रुवारी २०२४ होणार आहे.
भारतीय किसान सांघ-परीसंघ (सिफा) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील व सिफाचे मुख्य सल्लागार पी. चेंगल रेड्डी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत देशातील शेती आणि शेतकरी संपन्न होण्याकरिता पुढील १० वर्षाची धोरणे ठरवण्याबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन अजेंडा ठरणार आहे.
दिवस पहिला – दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ पर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांसह शेतमजूर, कामगार व इतर सर्व सामान्य नागरिकांना देशाचे नागरिक म्हणून हेडसांड न होता सन्मानाने जगता यावे याकरिता तसेच शेतकऱ्यांची प्रगती व राष्ट्राची उन्नती होण्याकरिता. सिफाच्या वतीने तयार केलेल्या अजेंड्यातील विषयावर चर्चा अजेंडा प्रत्यक्षात कसा अंमलबजावणीला येईल हे पाहणे. या अजेंड्यातील पुढील विषयांवर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळणे बाबत उपाययोजना राबवणे, पिक विमा, जागतिकीकरण आणि भारतीय शेती, कृषीमंत्री हे उपपंतप्रधान, शेतीसाठी वेगळे बजेट, शेती संलग्न संस्थांचे एकत्रीकरण (सीएसीपी, एफसीआय, नाबार्ड, आयसीएआर), शेतीमाल प्रक्रिया व निर्यात वाढवणे, साखर कारखानदारी बाबत मुक्त धोरण (जीवनावश्यक वस्तू कायद्यातून साखर वगळणे, दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करणे, देशातील 253 बंद कारखाने चालू करणे, इथेनॉल बाबतच्या सरकारच्या धोरणाबाबत), शेतकरी सक्षमीकरण (वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करणे, बाजार समितीने नियमनमुक्त, ग्राम न्यायालय तयार करणे, पंचायती सौरऊर्जेवर करणे, जलसाक्षर गाव बनवणे, आदिवासी शेतकऱ्यांना शेतजमिनी देणे, ग्रामीण पर्यटन) भारत आणि इतर देश जसे की चीन, अमेरिका, ब्राझील व व्हिएतनाम मधील उत्पादनातील प्रति हेक्टरी फरक, शहरी-ग्रामीण विषमता (आरोग्य, शिक्षण), प्रशासनातील बदल या विषयावर पहिल्या दिवशी चर्चा होणार आहेत.
दिवस दुसरा – दि.०६ फेब्रुवारी २०२४ रोजी मेंबर ऑफ पार्लमेंट फार्मर्स फोरम मधील राज्यसभा आणि लोकसभा खासदारांबरोबर धोरणात्मक चर्चा. टॅक्टरसह सर्व कृषी अवजारांना एमआरपी दिली जात नाही. याबाबत चर्चा. दिवस तिसरा – दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ पासून विविध राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणे. सिफाच्यावतीने तयार केलेला अजेंडा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून अंमल करणेस देणे. (बीजेपी, काँग्रेस, स.पा, ब.स.पा, जनता दल, डीएमके, टीडीपी, वायएसआरएसपी, बीआरएस, शिवसेना, एनसीपी, अकाली दल, आप इ. राजकीय पक्ष.
अशी तीन दिवसीय परिषद होणार आहे. या परिषदेस देशभरातील महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, ओडीसा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात नवी दिल्ली, हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, जम्मू काश्मीर या राज्यातील शेतकरी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.