संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हाणे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी / प्रशांत बाफना
संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हाणे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु निद्रिस्त गणपती मंदिर येथे सोमवार दि.29डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ वा पैठण वरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रीची आरती व महाभिषेक श्री.अथर्व श्रीकांत जोशी शनिशिंगणापूर यांच्या हस्ते होणार असून दुपारी १२ वाजता भाविकांना फराळाची व्यवस्था स्वर्गीय श्रीकांत देवा जोशी शनीशिंगणापूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चि.अथर्व श्रीकांत जोशी यांच्यावतीने करण्यात आली आहे.सायं ६ वा, ह.भ.प.गणेश महाराज रणमले घोडेगावकर यांचे जाहीर हरीकिर्तन होईल.सायं ७ वा श्रीची अरती व महाभिषेक श्री. रायभान बन्सी नागरे आव्हाने बु यांच्या हस्ते होणार आहे.रात्री 9.वा भाविक भक्तासाठी श्री. रायभान बन्सी नागरे आव्हाणे बु यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
रात्री १० वा आव्हाणे पंचक्रोशीतील भजनी मंडळ व दादोबा देव एकतारी भजनी मंडळीचा जागराचा कार्यक्रम होईल.तरी या धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आसे अवाहन निद्रिस्त गणपती आव्हाणे टस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी,सरचिटणीस अर्जुनराव सरपते माजी विश्वस्त अंकुश कळमकर,सुधाकर चोथे, नारायण जाधव,कारभारी तळेकर,रामदास दिवटे,कार्यालयीन सचिव लक्ष्मण मुटकुळे यांनी केले आहे.