अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना तात्काळ निलंबित करा; सकल मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी / प्रशांत बाफना
अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना तात्काळ निलंबित करा; सकल मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
व्हिजन २४ न्यूज
अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत असून हा विषय राज्यभर पेटला असताना अहमदनगरच्या महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मराठा समाजाचा सर्वे करण्यासाठी अवघ्या इयत्ता पहिली उत्तीर्ण असलेल्या आणि कॉम्प्युटर तसेच मोबाईलचा कुठलंही ‘बेसिक नॉलेज’ नसलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वे करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये अक्षरशः गवंडी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अहमदनगर महापालिकेच्या या गलथान कारभारामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ. जावळे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी भिंगारच्या सकल मराठा समाज संघाचे राजेश काळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील कोट्यवधी मराठा समाज बांधवांसमवेत पदयात्रेद्वारे मुंबईकडे निघाले आहेत. या मागणीसाठी त्यांनी ‘जीव गेला तरी चालेल, पण एक इंचही मागे हटणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीत अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मराठा समाज मागासलेला असल्याबद्दलचा करण्यासाठीच्या सर्वेकरिता अक्षरशः पहिली नापास असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबद्दलचा व्हिडिओ सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मराठा समाजबांधवांमधून अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. जावळे यांच्या बेजबाबदार आणि अनियंत्रित कारभाराविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर चुकीबद्दल त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी गणेश सातकर, किरण फटांगरे, नवनाथ कापसे, अनिल तनपुरे, संजय कापसे, योगेश साळुंखे, मच्छिंद्र बेरड, पंकज चव्हाण, अरुण चव्हाण, अमोल वागस्कर, रमेश तनपुरे, अंकुश शिंदे, गणेश काळे गणेश वागस्कर, कैलास काटे, सुदर्शन कैलास वागस्कर, नवनाथ मोरे, हर्षद काळे, राजेंद्र कडूस, अच्युत गाडे, ईश्वर बेरड, अमोल वागस्कर, भरत थोरात, संपत बेरड, अशोक कारले, अजय सपकाळ, श्याम वागस्कर, संतोष बोबडे, रवी लांडगे, मयूर वागस्कर, नितीन हापसे, योगेश करंडे, श्रीकांत क्षीरसागर, अनुप शिंदे, महेश निपाणी, विलास शिंदे, देवराज भालसिंग, राजेंद्र लांडगे, भूषण थोरात आदी उपस्थित होते.