शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा मोठ्या दिमाखात समारोप….
राहुरी : (बाभुळगाव ) दि. २१ जानेवारी २०२४, श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड यांच्या वतीने बाभुळगाव तालुका राहुरी जि. प. प्राथमिक शाळेमध्ये १६ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या सात दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर प्रेरणामंत्र घेऊन मान्यवरांचा सत्कार करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिबिरामध्ये १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ७ दिवस चाललेल्या शिबिरात विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, योगासने, भारतीय व्यायाम, कवायत, लाठी – काठी, तलवारबाजी, दांडपट्टा इ. मर्दानी खेळाचे धडे देण्यात आले. ७ दिवस घेतलेल्या प्रशिक्षणाचे समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने प्रात्यक्षिक करुन दाखविले व उपस्थितांचे मने जिंकून घेतली. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री बबलु (वस्ताद) टेकाळे, सचिव अमोलदादा निमोणकर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यानी मोठे कष्ट घेतले.
शिबीराचे प्रशिक्षक म्हणून गणेश माने, किरण राऊत यांनी काम पाहिले. मर्दानी खेळ प्रात्यक्षिक व प्रशिक्षण यशस्वीतेसाठी रावसाहेब (सनी) पाटोळे, बाळासाहेब थोरात, रावसाहेब पवार, ज्ञानदेव पाटोळे, सुधाकर वाघमारे, लक्ष्मण पाटोळे, राजू थोरात, राजु साबळे, सुजित पाटोळे, अनिल थोरात, गणेश चितळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विजय महामुनी व गणेश शिंदे सर यांनी शिबीराचे नियोजन तसेच शिबिराचा समारोप जबाबदारीने पार पाडला. कार्यक्रमासाठी ह. भ. प. भानुदास महाराज वाघमारे, ह. भ. प. आबासाहेब वाघमारे, ह. भ. प. पंढरीनाथ महाराज, श्री. संतोष उंडे, अध्यक्ष दत्तात्रय कजबे, उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सर्जेराव हरिश्चंद्रे सर व मुख्यध्यापिका मीनाक्षी येनगुल, श्रीगादि मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एप्रिल महिन्यातील सुट्टीमधे प्रशिक्षणाचा पुढील टप्पा घेतला जाणार असून इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे