कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी / मधुकर केदार
व्हिजन 24 न्यूज
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ९ वी शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक दहिगाव-ने येथे दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा.आ.पांडुरंग अभंग उपस्थित होते.
या सल्लागार समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य आत्मा अहमदनगर चे प्रकल्प संचालक श्री. विलास नलगे, विभागीय ऊस संशोधन केंद्र (आय.आय.एस.आर.), प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, इफको अहमदनगर चे उपव्यवस्थापक दिनेश देसाई, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड राहुरी चे उपव्यवस्थापक डॉ.सरोज वहाने, नाबार्ड अहमदनगर चे उपव्यवस्थापक विक्रम पठारे, रेशीम विभाग अहमदनगर चे रेशीम विकास अधिकारी ए.एम.कटे, तालुका कृषि अधिकारी शेवगाव चे अंकुश टकले, पशुधन विकास अधिकारी दहिगाव चे डॉ. बी.पी. शिंदे, कृषि पर्यवेक्षक शेवगाव चे सुनिल होडशिळ, आत्मा शेवगाव चे निलेश भागवत, श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सहसचिव रविंद्र मोटे, संस्थेचे संचालक काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले, अशोक मिसाळ तसेच शेतकरी प्रतिनिधी हुकूम बाबा नवले, संजय तनपुरे, कुमार गुंड, शशिकांत शिंदे, भानुदास शेरकर, सौ.मनीषा होडशिळ, एकनाथ कावरे आदी उपस्थित होते.
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी सन २०२३ मध्ये आत्तापर्यंत केंद्रामार्फत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती या सभेत सादर केली व विषय विशेषज्ञ नारायण निबे यांनी केव्हीके चा कृती आराखडा सादर केला. तसेच कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या ई कृषि न्यूजलेटर या माहिती पत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैठीकीनंतर शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रकाश हिंगे, नंदकिशोर दहातोंडे यांनी केव्हीके प्रक्षेत्रावरील चालू असलेल्या उपक्रमांना तसेच विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ नारायण निबे, इंजि. राहुल पाटील, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, वैभव नगरकर, अनिल देशमुख, डॉ.प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे, गणेश घुले व संजय कुसळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बडधे तर माणिक लाखे यांनी आभार मानले.