प्रवीण देशमुख यांना मानद डॉक्टरेट
जिल्हा प्रतिनिधी : मधुकर केदार
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मध्ये कार्यरत असलेले लघुलेखक प्रवीण युवराज देशमुख यांना माँ भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, इंदोर (मध्यप्रदेश) यांच्याकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
७ ऑक्टोबर रोजी इंदौर येथे कुलगुरू डॉ. दिप्ती भार्गव यांच्याहस्ते व संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष भार्गव, कुलसचिव डॉ. विद्या भूषण सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात श्री. देशमुख यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल श्री. देशमुख यांचा श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ नरेंद्र घुले पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे सहसचिव रवींद्र मोटे, प्राचार्य डॉ. रामकिसन सासवडे उपस्थित होते.