ब्रेकिंग न्यूज

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयाना 3 चे लँडिग झाले

व्हिजन 24 न्यूज

23 ऑगस्ट 2023 ची तारीख भारत काय तर जग सुद्धा कधी विसरणार नाही. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून आज इतिहास घडवला. अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा फडकला आहे. NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं आहे.

चांद्रयाना 3 चे चंद्रावर लँडिग झाले आहे. लँडिंगआधी चांद्रयाना 3 ची एक महत्त्वाची चाचणी केली गेली. चांद्रयान लँडरचे फ्यूएल पॅरामीटर्स तपासले गेले. ते फायर करुन योग्य रितीने चालतात की नाही हे तपासण्यात आले. जर त्या चाचणीचा रिपोर्ट ओके आली. यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात आली. यानंतर चांद्रयान 3 लँडरची लँडिंग प्रक्रिया सुरु केली गेली. चांद्रयानमध्ये चार थ्रॉटल स्टीयरिंग इंजिन आहेत, ज्याची क्षमता 800 न्यूटन बल इतकी आहे.. इंजिन फायरिंगद्वारेच लँडरचा वेग आणि उंची कमी जास्त करुन नॅव्हिगेशनच्या मदतीने अचूक लँडिंग करण्यात आले.

अवकाश संशोधन क्षेत्रात आज भारताने इतिहास घडवला. तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुललीय. भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कारण भारताच्या इस्त्रोने आज ऐतिहासिक कामगिरी करणारेय. चांद्रयान मोहिम यशस्वी ठरली आहे. भारताचं चांद्रयान-3 आज चंद्राच्या दक्षिण भागावर यशस्वीरित्या उतरल आहे. विक्रम लँडिंग रोव्हर चंद्राच्या दक्षिण भागावर उतरले. भारताने त्यासोबतच नवा विक्रमही रचला आहे. कारण, चंद्राच्या दक्षिण भागावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. ज्या क्षणाची करोडो भारतीय वाट पाहत होते. आज ज्या क्षणासाठी करोडो भारतीय प्रार्थना करत होते. तो क्षण अखेर साकार झाला. भारताने चंद्रावर यशस्वी स्वारी केली. भारतीय तिरंगा चंद्रावर फडकला आहे. चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान -3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होते. 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत चांद्रयान – 3 यशस्वीरित्या पोहोचलं होतं. मात्र, आजच्या दिवशी सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण याआधी चांद्रयान – 2 अगदी अखेरच्या क्षणी अपयशी ठरलं होतं. तेव्हा चंद्रावर लँडिंग करेपर्यंत सर्वांची धाकधूक वाढली होती. करोडो भारतीयांचे श्वास रोखले गेले होते. मात्र, इस्त्रोच्या भारतीय शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं आणि चंद्रावर भारताचं पाऊल पडले. भारताचं चांद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×