रायगडात इरशाळवाडी येथे दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू; 100 पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता
रायगडच्या इरशाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जणांचा आणखी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
व्हिजन 24 न्युज
दि. २०.०७.२०२३, रायगडच्या खालापुरमधून आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. रायगडच्या इरशाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जणांचा आणखी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता रायगडच्या खालापुरमधून आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. रायगडच्या इरशाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जणांचा आणखी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच गावावर दरड कोसळल्याने किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली दबल्याची माहिती आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आलं असून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरापर्यंत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यावेळी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास इरशाळवाडी या गावावर भलीमोठी दरड कोसळली असून यात चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. परंतु ढिगाऱ्याखाली ४० ते ५० घरं असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता घटनास्थळी नागरिकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. इरशाळवाडी हे गाव इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळं या भूस्खलनाच्या घटनेत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर आता राज्य सरकारकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याने एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
रायगडच्या इरसाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना समजताच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे हे तातडीने मुंबईहून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाची आपातकालीन पाहणी करत मंत्र्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इरशाळवाडी येथीर भूस्खलनाच्या घटनेची माहिती घेतली आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून आज दुपारी मुख्यमंत्री इरशाळवाडी दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.